प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात संपन्न झालेल्या या सोहळ्यास मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी.देशमुख, घनश्याम सराफ, कला आणि वाणिज्य महाविद्यालय मालाडचे प्राचार्य डॉक्टर जयंत आपटे, एन.एम.कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनोमिक्सचे प्राचार्य डॉक्टर पराग अजगावकर, दिपक शिंदे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब-हाटे, रामशेठ ठाकुर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारघरचे प्राचार्य एस.टी.गडदे, प्राचार्य शरद कुमार शाह, कल्चरल कमिटीच्या चेअरमन प्राध्यापिका नामिता अखौरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.